दिनांक : २ आँगस्ट २०२२ पालघर:प्रतिनिधि
डहाणू येथे उपविभागीय कार्यालयात अव्वल कारकून पदावर कार्यरत असलेले भूषण पाटील यांचा दिनांक १ ऑगस्ट महसूल दिनी त्यांनी सण २०२१ / २०२२ या महसूल वर्षात जनतेच्या दैनंदिन जीवनातील महसूल कामे,कायदा व सुव्यवस्था,नैसर्गिक आपत्ती,मदतकार्य,निवडणूक,सामाजिक अर्थ सहाय्य योजनेत, उत्तम काम केल्याबद्दल त्यांचा आज प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,तहसीलदार अभिजित देशमुख व इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.