शिंदखेडा येथील तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे विविध मागण्यांचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुका ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी देवरे यांना कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तालुका अध्यक्ष महेश युवराज कोळी यांच्या नेतृत्वात व पदाधिकारीच्या उपस्थितीत देण्यात आले. निवेदनातून ग्रामपंचायत कर्मचारीना वेतन श्रेणी व निवृत्ती वेतन तसेच सुधारित किमान वेतन यासह इतर मागण्या आहेत. राज्यातील 27920 ग्रामपंचायत काम करित असलेल्या सुमारे साठ हजार कर्मचारीयांच्या वेतनाचा प्रश्न मागील वीस वर्षापासून प्रलंबित आहे.

याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी चा दि.10 जुलै 2011 रोजी नागपूर येथे लाॅग मार्च व 7 जानेवारी 2019 ला लातूर येथे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. 10 जुलै 2018 रोजी तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी वरील मागण्या मंजूर करण्याचै आश्वासन दिले होते.त्याचे इतिवृत्त उपलब्ध आहे.तसेच लातूर च्या अधिवेशनात देखील ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री यांनी मार्गदर्शन केले होते. व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे 20 जानेवारी 2020 रोजी राज्यातील 34 जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागणीचा अद्याप निर्णय झालेला नाही राज्यातील साठ हजार कर्मचारी मध्ये असंतोष पसरला असुन म्हणून 9 मार्च 2022 रोजी मुंबईत निराधार मोर्चाचे आयोजन केले आहे. तरी मोर्चात राज्यातील प्रत्येक जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी होणार आहेत.हयावेळी तालुका अध्यक्ष महेश कोळी, उपाध्यक्ष भिकन महाले, सचिव सतीश पाटील, सहसचिव जितेंद्र पेंढारकर, संघटक बाळकृष्ण साळुंखे, सागर चव्हाण, सदस्य अरुण नगराळे ,माणिक जाधव, देवेसिंग सोनवणे, राजेंद्र गिरासे, राकेश निकम, मच्छिंद्र भिल आदी उपस्थित होते.




