चोपडा (विश्वास वाडे) येथील चोपडा नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा योजनेंतर्गत रु. ६४.७६ कोटीच्या जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभ उद्घाटन सोहळा आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे – पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, विशेष उपस्थितीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतिष पाटील, आमदार लताताई सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राजीव देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॕड. संदिप पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी खासदार अॕड. वसंत मोरे, माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, मनिष जैन, जेडीसीसी संचालक घनश्याम अग्रवाल, चोसाका माजी चेअरमन घनश्याम पाटील, चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोरखतात्या पाटील, कृ.उ.बा. संचालक सुनिल जैन, जेडीसीसी माजी उपाध्यक्षा इंदिराताई पाटील, विजयाताई पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अंभियंता शिवशंकर छगन निकम, माजी उपनगराध्यक्ष असगरअली सैय्यद आदिंची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे.