भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये अखेर शवविच्छेदनाला आजपासून सुरूवात !
भुसावळ (ओमशंकर रायकवार) भुसावळ अंतर्गत कुरघोड्यांमुळे भुसावळ पालिका रुग्णालयात शवविच्छेदन कक्षाला टाळे लागल्याने शवविच्छेदन करण्यासाठी अत्यंत गैरसोय होत होती. या संदर्भात माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी वैयक्तिक लक्ष घालून जिल्हा शल्य चिकित्सकांशी संवाद साधल्यानंतर भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये सोमवार, ११ एप्रिलपासून शवविच्छेदनाला सुरूवात झाली आहे.
ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमधील एका रुममध्ये तात्पुरत्या स्वरुपात पीएम रुम रविवारपासून सुरू करण्यात आली.पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात शवविच्छेदन कक्ष असलातरी पालिकेकडे शवविच्छेदनासाठी डॉक्टर नसल्याने गेल्या १३ वर्षांपासून ही सुविधा बंद होती. डिसेंबर २०२० मध्ये ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी यांनी पालिकेच्या रुग्णालयातील शवविच्छेदन कक्ष स्वत: पुढाकार घेवून नागरीकांच्या सुविधेसाठी मागितल्याने तो उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र ६ मार्च रोजी पालिकेने कुरघोड्या करीत शवविच्छेदन कक्षाला कुलूप ठोकले होते. यानंतर ही सेवा बंद झाली होती.
अखेर ट्रामा केअर सेंटरमध्ये कक्ष उघडला
ग्रामीण रुग्णालयात एका रुममध्ये पक्के शवविच्छेदन गृह तयार होत नाही, तोपर्यंत एका दुसऱ्या कक्षात तातुरता शवविच्छेदनाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी भुसावळात झालेल्या अपघातातील मयतासह मुस्लीम कॉलनीत मयत झालेल्या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनकरण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, ‘ पालिका रुग्णालयातील पीएम रुममध्ये हेल्पर सुरेश हंसकर यांची पालिकेने कंत्राटी स्वरुपात नियुक्ती केल्याने त्यांची करार काळातील नियुक्ती ट्रामा केअर सेंटरमध्ये केल्यास पीएम करताना मदत होणार आहे.रेल्वेचे जंक्शन असल्याने शहरात अनोळखी मृतांची संख्या अधिक असते. कायद्यानुसार अशा मृतदेहांवर ७२ तासांनी शवविच्छेदन करावे लागते. यामुळे किमान तीन दिवस ठेवावा लागतो. आता ग्रामिण रुग्णालयात एकाच वेळी दोन मृतदेह ठेवता येतील, अशी शवपेटी उपलब्ध आहे. यामुळे पीएम रुममध्येच मृतदेह ठेवता येणार आहे.सायंकाळी किंवा रात्री अपघात मृत झालेले शव देखील पेटीत ठेवता येतील.दुःखाच्या काळातील त्रास कमी होईल भुसावळसारख्या मोठ्या शहरात दररोज दुर्देवी घटना घडून मृत्यू ओढवतो. मात्र साधी पीएमची सुविधा नसल्याचे कळाल्यावर धक्का बसला. यासंदर्भात शनिवारीच जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील व भुसावळचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरींसोबत चर्चा केली. त्यांनी सकारात्मकता दाखवून ही सेवा सुरु केली. याचे कौतूक वाटते. संपूर्ण भुसावळकरांनाच यामुळे दिलासा मिळाला.
ही बाब भुसावळकरांच्या दुखा:च्या काळातील त्रास कमी करणारी असल्याचे माज मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. डिसेंबर २०२० पासून पालिका रुग्णालयातील कक्षात सेवा सुरु केली होती. सुमारे १५५ मृतांवर शवविच्छेदन केले. मात्र पालिकेच्या आडमुठे धोरणाने ही सेवा बंद झाली. या महिन्याभराच्या काळातही दुर्देवाने मृत्यू झालेल्यांवर यावल येथे आम्हीच आमच्या अॅब्युलन्सने शव देवून विच्छेदनाची सेवा दिली. आता तर ग्रामिण रुग्णालतच तात्पुरत्या रुममधून ही सेवा सुरु झाली आहे. यामुळे हा प्रश्न कायमस्वरुपी सुटला असल्याचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी म्हणाले.