महाराष्ट्र
अमृतसरमध्ये गोळीबारात ५ जवानांचा मृत्यू ; अनेक जण गंभीर जखमी !
अमृतसर (प्रतिनिधी) येथील खासा येथे ‘बीएसएफ’च्या जवानामध्ये आपापसात किरकोळ वाद झाला. नंतर हा वाद इतका विकोपाला गेला, की एका जवानाने आपल्याच साथीदारांवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यात ५ जवानांचा मृत्यू झाला असून, १० जवान गंभीर जखमी झाल्याचे समजते.
गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव कटप्पा आहे. अमृतसरमधील खासा गावातील ‘बीएसएफ’च्या मेसमध्ये हा प्रकार घडला.. जखमी जवानांना तातडीने गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, ‘बीएसएफ’ जवानाने केलेल्या गोळीबारामागील कारण समजले नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. याबाबत ‘बीएसएफ’कडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे.



