PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक !
पुणे (वृत्तसंस्था) कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या पुण्यात लपून बसली होती आज सकाळी तिला कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती 18 वी आरोपी आहे. दिव्याचा पती राजेश हगारगी याला यापूर्वी अटक करण्यात आली आहे तर त्यावेळी ती पळून जाण्यात यशस्वी झाली होती.
गुलबर्गा इथल्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती.
न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते. अखेर पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी दिव्या हागारगी यांना गुरुवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी याबाबतची माहिती दिली आहे.