केतकी चितळेवर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…!
नाशिक (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या तोंडाला काळं फासण्याचं काम केलं. त्यांच्या या हल्ल्याचा समर्थन नाही. पण कुणाच्याही वडिलांनी मरावं अस बोलणं कोणत्या संस्कृतीत बसतं? हा कोणत्या संस्कृतीचा भाग आहे, असा संतप्त सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितीत केला. खासदार सुप्रिया सुळे या नाशिकच्या दौऱ्यावर होत्या.
मागील दोन दिवसांपासून केतकी चितळे वाद राज्यभर पेटला आहे. पण, काही लोकांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर काहीतरी लिहिलं आहे. कुठल्याच कायद्यात हे बसत नाही. हे खूप दुर्दैवी आहे. न्यायालय त्याच काम करेल. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेच्या तोंडाला काळं फासण्याचं काम केलं. त्यांच्या या हल्ल्याचा समर्थन नाही. पण कुणाच्याही वडिलांनी मरावं अस बोलणं कोणत्या संस्कृतीत बसतं? हा कोणत्या संस्कृतीचा भाग आहे. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांंनी खंबीरपणे जाहीर भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार आहे. अशी वेळ दुसऱ्या कोणावर आली तर मी देखील तुमच्या सोबत उभी राहील, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमच्या अमोल मिटकरी यांना देखील नोटीस आली आहे. देशात एक यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आणि कोर्ट आहेत. माध्यमाचा गैर वापर करणं हास्यअसपद आहे. मी भान ठेवून वागते. माझ्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कृतीचे संस्कार आहे. 55 वर्ष हल्ले होऊन देखील माझ्या वडिलांनी पण कोणाला असं उत्तर दिलं नाही, ही आमची संस्कृती मला त्याचा अभिमान आहे, असंही सुळे म्हणाल्या.
यंत्रणांचा गैर वापर होतो हे वास्तव आहे. अनिल देशमुख यांच्याबाबत काय झालं. 109 वेळेस देशमुख यांच्यावर रेड करण्याचा विक्रम केंद्राने केला. मग 108 वेळेस तुम्ही काय करत होतात? काहीच मिळालं नाही म्हणून एवढ्या वेळेस रेड करावी लागते, अशी टीकाही सुळे यांनी केली. ओवेसी हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले, याबद्दल या गोष्टींचा इतका विचार नाही करत. मला माझ्या मतदारसंघात खूप काम आहे. महागाई, सिलेंडर यापेक्षा मला काही महत्वाचं वाटत नाही. सुषमाजी म्हटल्या होत्या, ‘आकडों से पेट नही भरता’ पंतप्रधानांना विनंती, सर्व पक्षीयांची बैठक बोलावून महागाईवर काय करू शकतो यावर चर्चा करावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.