विद्यार्थ्यांनी रेखाटले छत्रपतींचे गड-किल्ले, विविध प्रसंग
साक्री (प्रतिनिधी) येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती निमित्त गड-किल्ल्यांवर आधारित चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली होती. यात तालुक्यासह तालुक्यात बाहेरील अनेक स्पर्धकांनी शिवरायांच्या गड किल्ल्यांची व विविध प्रसंगांची अतिशय सुबक चित्रे रेखाटलेली होती. स्पर्धेस मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने शिवजयंती घराघरात पोहोचल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
येथील शिवदुर्ग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी शिवजयंती निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात गड किल्ले बांधणी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा भरण्यावर संयोजकांचा भर असतो. यंदा गड-किल्ल्यांवर आधारित चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली होती. यात पाच गटात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात पहिल्या चार गटांसाठी छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हा विषय होता तर खुल्या गटासाठी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंग असा विषय होता. यात तालुक्यासह तालुक्याबाहेरील 600 हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेऊन आपली चित्र संयोजकांकडे जमा केली होती. गड-किल्ल्यांची व शिवरायांच्या विविध प्रसंगाची अनेक सुबक चित्र स्पर्धकांनी रेखाटलेली होती यामुळे परीक्षकांना परीक्षण करणे देखील अवघड बनले होते. कलाशिक्षक एन.जी. मोरे व सिद्धार्थ पगारिया यांनी चित्रांचे परीक्षण केले. स्पर्धेत सहभागी निवडक चित्रांचे छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या आवारात प्रदर्शन भरविण्यात आले होते. तर याच वेळी तहसीलदार प्रवीण चव्हाणके, प्रा.एल.जी.सोनवणे, विजय भोसले, पी.झेड.कुवर, नगरसेवक पंकज मराठे, सुमित नागरे, राहुल भोसले, नगरसेविका जयश्री पगारिया, विनोद पगारिया, डॉ.अनिल नांद्रे, संदीप मराठे, किशोर वाघ, अशोक गिरी, डॉ.ललित नागरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेत विजयी स्पर्धक, अ गटात परी घरटे हिने प्रथम, सिद्धांत चौधरी द्वितीय, मयंक शेवाळे तृतीय तर श्रावणी शिंदे, श्रवण देसले व पार्थ पाटील यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. ब गटात हेमल ठाकरे हिने प्रथम, श्रुतिका साळुंके द्वितीय, समर्थ श्रीवास्तव तृतीय तर गार्गी सोनवणे, कनाद वानखेडे, कृतिका भावसार यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. क गटात साईनाथ गवांदे याने प्रथम, मंदार कासार द्वितीय, प्रियंका राजपूत तृतीय तर हर्षिता जाधव, समृद्धी सोनवणे, काजल कश्यप व रणवीर नांद्रे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. ड गटात प्रियंका महाले प्रथम, प्रथम भोसले द्वितीय, कल्याणी चव्हाण तृतीय तर सई पवार, केतन पाटील व वेदांत खैरनार यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तर खुल्या गटात किरण गवळी याने प्रथम, अजय चौरे द्वितीय, युवराज बोरसे तृतीय तर कोमल पाटील, योगिता सोनवणे व जान्हवी सोननिस यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान या वेळी भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पद्मदुर्ग या जलदुर्गाची प्रतिकृती देखील साकारली होती. स्पर्धेचे संयोजन शिवदुर्ग प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी केले.