सोयगाव येथे मानुसकीची भाऊबिज संपन्न
सोयगाव (जि. औरंगाबाद) : विवेक महाजन , तालुका प्रतिनिधी
सोयगाव नाट्यपंढरी नगरीमधे दि.६ शनिवार रोजी भाऊबिज महोत्सवाचे आयोजन समाजप्रबोधनकार विष्णु मापारी सोयगावकर व सहकारी यांच्या वतीने दरवर्षी प्रमाने यंदा ही करण्यात आले होते.ज्या भगिनींना भाऊ नाही किंवा काही कारणाने तो येऊ शकला नाही व गरीब विधवा वंचित निराधार दिव्यांग आशा सेविका स्वच्छता करणार्या महिला यांना निमंत्रित करण्यात आले होते.सर्व भागिनिंच्या हातावर प्रथमता सेनीटायझर देऊन सीताबाई मापारी कु.पूजा व आरती मापारी यांनी पारंपरिक पद्धतीने सर्व महिलांचे स्वागत केले. ह.भ.प.सुधन्वा महाराज केनेकर यांच्या हस्ते शिवशक्ति पूजन संपन्न झाले . उपस्थित भागिनिनी समाज प्रभोधनकार विष्णु मापारी यांचे औक्षण केले.इडा पीड़ा टळो माझे भावाला बलिचे राज्य येवो असा आशीर्वाद दिला.यावेळी भाऊबिज म्हणून मापारी परिवारा तर्फे साडी चोळी फराळ मास्क घेतांना भागिनिंचे डोळे पानावाले तर समाज प्रभोधनकार विष्णु मापारी यांचे ही अश्रु अनावर झाले .रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते हे श्रेष्ट असते हे यावेळी सिद्ध झाले.आपल्या भगिनीं समोर नतमस्तक होतांना विष्णु मापारी म्हणाले की , आजुन कोरोना संपला नाही सर्वांनी आपल्या सह कुटुंबाची काळजी घ्या. कोरोना विरोधी लस सुरक्षित आहे प्रत्येक भगिनींने व त्यांच्या कुटूंबियांनी लस घ्यावी आपले कुटुंब आपली जबाबदारी हे लक्षात ठेवावे पुढच्या वर्षी सुद्धा आनंदाने भाऊबिजेला या असे सांगतांना त्यांचा कंठ दाटून आला,यावेळी जानकाबाई पंचाळ,देवकाबाई पगारे,संगीता वानखेडे,सोनी साळवे,रत्नाबाई मोरे, विजयाबाई पगारे,रमाबाई पगारे,अल्काबाई पगारे , विमलबाई पगारे,शीतल वानखेडे,लताबाई श्रीखंडे,लताबाई नवगिरे,संध्याबाई पगारे,शोभा केनेकर,शोभा शेवालकर, नलिनीताई जामदार,याभगिनींना भाऊबिज देण्यात आली.या कार्यक्रमात विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेरमन राजेंद्र काळे,योगेश बोखारे,रविंद्र काटोले,संतोष सोनवने,दत्तु काटोले,विनोद जमदाडे, भास्कर श्रीखंडे, इत्यादि उपस्थित होते,सदरिल कार्यक्रम करोली माता मंदिर येथे कोविड-१९ चे सर्व नियम पाळत उत्साहात संपन्न झाला .
समाजप्रबोधनकार विष्णु मापारी यांची आर्थिक परिस्थिति नाजुक असली तरी ते दर वर्षी आपण समाजाचे काही देने लागतो या उदात्त हेतूने प्रेरित होउन कार्यक्रम करतात,त्या बद्दल त्याचे सर्व स्तरावरन कौतुक होत आहे.