महाराष्ट्र
शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथे शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक ; पंचनामे करण्याची शेतकऱ्याची मागणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील युवराज झिपरू देशमुख यांच्या शेतातील पाच एकर ऊस जळून खाक झाला. महा विज वितरण कंपनी महाराष्ट्र यांचा निष्काळजी कारभारामुळे शेतकऱ्याचे नुकसान संपूर्ण पाच एकर उसाचे जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. तसेच शेवाडे गावातील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.
या परिसरातील ही शॉर्टसर्किटमुळे घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच गावातील शेतकरी वर्ग व तरुणांनी धाव घेत ऊसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु काही शिल्लक राहिले नाही. तसेच युवराज झिपरू देशमुख या शेतकरीची पंचनामे करण्याची मागणी केली आहे व भरपाई मिळावी असे यावेळी सांगण्यात आले आहे.