राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा जुनी पेन्शन लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात यावा ; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी
देगलूर (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी 1982 ची पेन्शन योजना बंद करून नवीन अन्यायकारक योजना DCPS/NPS लागू केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात आसंतोष आहे. या बाबीचा विचार करून नुकतेच आपले काँग्रेस पक्षाचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.
काँग्रेस पक्ष हा नेहमी सर्वसामान्य जनता शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला आहे. यात तिळमात्र शंका नाही महाराष्ट्रात आपली सत्ता आहे. कर्मचार्यांच्या भावना समजून घेऊन राजस्थान प्रमाणे महाराष्ट्रातील जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात यावा व कर्मचाऱ्यांचे कुटुंब व भवितव्य सुरक्षित करावी अशा मागणीचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे बसवराज जगन्नाथराव पाटील वन्नाळी कर निमंत्रित सदस्य शिक्षण व क्रीडा समिती जिल्हा परिषद नांदेड यांनी केली आहे.