बोरद येथे जागतिक परिचारिका दिन साजरा
बोरद : बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. अहोरात्र कुटुंबाची स्वतः त्याचबरोबर जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या स्वतःची जीवाची बाजी लावून रुग्णांना सेवा देणाऱ्या अशा माझ्या सर्व परिचारिकांना भगिनींना मानाचा मुजरा अशा शब्दात बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
प्रथम त्यांनी आज परिचारिका लॉरेन्स यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले. त्यावेळी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व परिचारिका वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची प्रतिमेचे पूजन केले. यावेळी डॉ. अरुण लांडगे,डॉ. ज्योती पावरा,डॉ.पंकज पावरा यांनी परिचारिका दिन का साजरा करणे गरजेचे आहे याचे सविस्तर वर्णन केले. १२ मे १८२० लॉरेन्स यांचा जन्म झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी लॉरेन्स यांनी जखमी सैनिकांची सर्वत्र काळजी घेतली होती. व संपूर्ण जगाला त्यांनी रुग्णसेवेचा पायंडा घालून दिला होता. त्यांनी १८६० मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच नार्सिंग स्कूलची स्थापना केली. या स्कूलमध्ये परिचारिका घडल्या व त्यांना रोजगार मिळू लागला म्हणून आज जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जातो. असे सांगितले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लांडगे,डॉ. पंकज पावरा, डॉ. ज्योती पावरा, दिपमाला मसुरकर, सुपरवायझर अरुणा चौधरी, कलावती तडवी,सुमित्रा गावीत, प्रिया पेंढारकर, सुमित्रा पाडवी, मनोज पिंजारी, संदीप शेलार, भारती भामरे, श्रीकांत पाटील, दिपक बेहरे, देसले नाना इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.