शिंदखेडा येथील व्यापारी सांस्कृतीक मंडळाच्या वतीने डीजे वाद्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी तहसीलदार व नगरपंचायत, पोलिस स्टेशन यांना निवेदन
शिंदखेडा (यादवराव सावंत) शहरातील गांधी चौकात मारुती मंदिर व महादेव मंदिराच्या जवळ शेवंती ला आलेल्या नवरदेवाची डीजे सह मिरवणूक आली असता तब्बल एक ते दीड तास नियमांच्या बाहेर मोठ्या आवाजात डीजे वाद्य वाजवली जात असतात म्हणून तेथील व्यापारी व रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो यावर कारवाई व्हावी व असे आशयाचे निवेदन नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले सह पोलिस स्टेशन व नगरपंचायत यांना देण्यात आले.
सदर निवेदनातून शिंदखेडा व्यापारी सांस्कृतिक व्यापारी मंडळाच्या वतीने आज तहसीलदार, पोलीस स्टेशन, नगरपंचायत यांना गांधी चौकातील महादेव मंदिर व मारुती मंदिराजवळच्या नवरदेव शेवंती ला येत असताना डीजे वाद्य सह हजर होतात त्यानंतर तब्बल एक ते दीड तास सदरील डीजे वाद्य कायद्याच्या नियमांच्या बाहेर वाजवले जातात आपल्या आमच्या व्यापारी बंधूंना व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावे लागते यावेळेस कोणालाही बोलता येत नाही महत्वाचे मोबाईल फोन आले तर बोलले होत नाही. येणाऱ्या ग्राहकाला बी.पी.चा त्रास असणाऱ्यांना डीजेच्या मोठ्या आवाजाने त्रास सहन करावा लागतो म्हणून असे ग्राहक दुकानात दुसऱ्यांना येण्यास नकार देतात परिणामी व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते म्हणून आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून डी.जे मालकांवर पायबंद घालावा आणि मर्यादा बाहेर आवाज व वेळेवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.
यावेळी व्यापारी सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण प्रल्हाद बोरसे, उपाध्यक्ष प्रेमराज रूपचंद मराठे , सचिव सुभाष भानुदास तलवारे खजिनदार रविंद्र मुरलीधर लखोटे, संचालक- मोहन राजाराम परदेशी, उदय लालचंद वानखेडे, राजेंद्र तुळशीराम पाटील ,राजेश ईश्वरलाल शहा ्प्रकाश कन्हैयालाल गोधवानी ,अनिल सुधाकर कौठळकर हसनभाई हातीमभाई बोहरी, सुनील गुलाबराव पाटील, रमेश चन्द्र बंन्सीलाल पाटील, तालीब सलीम भाई नोमानी ,मनीष राजमल बोथरा पदाधिकारी उपस्थित होते.