शिंदखेडा मतदारसंघात धमाणे येथे धुळे व नंदुरबार जिल्हा पाणीपुरवठा संस्थेच्यावतीने संदिप बेडसे यांचा जाहीर सत्कार
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादी चे माजी जिल्हा अध्यक्ष संदिप दादा बेडसे यांनी यांच्या अथक प्रयत्नाने शिंदखेडा तालुक्यातील ८ व नंदुरबार जिल्ह्यातील १४ उपसा जलसिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी ११५ कोटी रु. मंजूर केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची प्रलंबित समस्या मार्गी लावल्यामुळे हा सत्काराचा कार्यक्रम मौजे धमाणे येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संदीपदादा बेडसे यांचा जाहीर सत्कार मान्यवर शेतकऱ्याच्या हस्ते करण्यात आला. भविष्यात शिंदखेडा मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. राज्यात सत्ता असताना पुरेशा प्रमाणात निधी मंजूर करण्यात येईल व अपुर्ण कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. असे सत्काराला उत्तर देताना संदीप बेडसे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित नानासाहेब जिजाबराव गोरख पाटील धमाणे, निळकंठ पुंडलीक पाटील कुरकवाडे, दिलीपराव पतंगराव कदंमबाडे, रविंद्र निंबा पाटील, साहेबराव पेढारकर विरदेल, भानुदास बळीराम पाटील कुरकवाडे, आनंदराव पाटील, सुजीत पाटील, परमानंद पाटील धमाणे, अँड प्रशात पाटील, भगवंतराव पाटील, लोहगाव सरपंच महेंद्र पाटील, एम पी पाटील विरदेल, डॉ कैलास ठाकरे तालुका अध्यक्ष, दिपक जगताप ग्रंथालय जिल्हाध्यक्ष, दिपकदादा गिरासे शिदखेडा विधानसभा क्षेत्र प्रमुख, दयाराम कुवर सर दोडाईचा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष, चिराग माळी तालुका युवक अध्यक्ष, दुर्गेश पाटील युवक विधानसभा क्षेत्रप्रमुख, किसान सेलचे गुलाबराव पाटील, सुरेश अहिरराव माजी सरपंच खलाणे, राजेंद्र पाटील गोराणे, महेंद्र सिसोदे नरडाणा, हिमांशू पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.