सिल्लोड येथे रमजान ईद उत्साहात साजरी ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या नागरिकांना शुभेच्छा
सिल्लोड : सिल्लोड येथे रमजान ईद उत्साहात संपन्न झाली. कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने दोन वर्षानंतर मुस्लिम बांधवानी शहरातील ईदगाह येथे एकत्रितपणे नमाज अदा केली. सकाळी 8 वाजता ईदगाह येथे ईदच्या नमाजला सुरुवात झाली होती. नमाज नंतर महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थित मुस्लिम – हिन्दू बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्या दिल्या. दिवसभर सर्वत्र ईदचा उत्साह पहायला मिळाला. ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी शिरखुर्मा चे आयोजन केले होते. तर संपूर्ण शहरात सर्व लधार्मिय बांधवांना एकमेकांना गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा देतांना दिसले.
ईदगाह येथे रमजान ईद निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार रमेश जसवंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, राजेंद्र ठोंबरे, विशाल जाधव, सयाजी वाघ, शिवसेना शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप निकळजे, वीज वितरण विभागाचे उपविभागीय अभियंता बनसोडे, शहर अभियंता अनिल सैवर, काँग्रेसचे भास्कर घायवट, पपिंद्रपालसिंग वायटी, नगरसेवक विठ्ठल सपकाळ शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, मनोज झंवर, अकिल वसईकर ,रतनकुमार डोभाळ, सुधाकर पाटील, राजू गौर, सलीम हुसेन, सिल्लोड सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र बन्सोड, कुणाल सहारे, संजय मुरकुटे, दिलीप वाघ , गणेश डकले, जगन्नाथ कुदळ, कैलास इंगे, दीपक अग्रवाल, प्रवीण मिरकर, सुशील गोसावी ,राजेश्वर आरके यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी , अधिकारी व सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती होती.
महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सेना भवन येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना रमजान ईद, अक्षय तृतीया, भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.