क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीमहाराष्ट्र
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला अटक ; ड्रग्ज घेतल्याचा आरोप
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. “ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या ६ लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी एनआयला दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अजून श्रद्धा कपूर किंवा तिचे वडील शक्ति कपूर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. सिद्धांत आधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती.