“प्रा. डॉ. लक्ष्मण उलगडे यांची लातूर जिल्हा समन्वयकपदी निवड”
देगलूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत लातूर जिल्हा ग्रामीण समन्वयक पदी देगलूर येथील रहिवाशी प्रा. डॉ. लक्ष्मण उलगडे यांची नियुक्ती करण्यात आली. ते उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक, करिअर कट्टा चे महाविद्यालयीन समन्वयक आणि व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. उलगडे हे लोकप्रशासन विभागा मार्फत विद्यार्थी केंद्रित स्पर्धात्मक दृष्टीकोनातून लातूर जिल्ह्यातील प्रमुख शासकीय व प्रशासकीय कार्यालयास प्रत्यक्ष अभ्यास भेटी अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम मागील बारा वर्षांपासून सातत्याने राबवित आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याची यशवंत शितोळे (महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष) यांनी दखल घेऊन लातूर जिल्हा समन्वयकपदी निवड केली आहे. याबद्दल डॉ. लक्ष्मण उलगडे यांचे भारतीय लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार अप्पा हसरगुंडे, कोषlध्यक्ष शंकरअप्पा हरकरे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. ए. ए. काळगापुरे , कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत धनुरे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.