‘दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही’ ; लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला सज्जड दम !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीमाभागात दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न भारतीय जवानांकडून हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना दिसत आहे. या सर्व मुद्द्यांवर भारताचे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असं देखील नरवणे यांनी म्हटलं आहे.
भारत आणि चीन यांच्यादरम्यान, बुधवारी चौदावी सैन्यस्तरावरील चर्चा पार पडली. लष्करप्रमुख एम.एम. नरवणे हे स्वतः देखील या चर्चेत सहभागी झाले होते. या चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरुनही पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. सीमाभागातील घुसखोरी, पाकिस्तान या मुद्द्यांवर त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहे.
काय म्हणाले एम.एम. नरवणे?
चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मकता दाखवली आहे. पण चर्चेतून प्रश्न सुटला नाही आणि युद्ध करण्यासारखी परिस्थिती उद्भवली, तर आम्हीच जिंकू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. उत्तर सीमेवरील परिस्थितीबाबत लष्कर प्रमुखांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. चर्चा हा प्रश्न सोडवण्यासाठी, वाद मिटवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहेच. पण त्यानं वाद मिटला नाही, तर युद्धातून भारताचाच विजय होईल, असाही विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. एएनआयनं याबाबतचा व्हिडीओदेखील आपल्या ट्विटरवरुन जारी केला आहे.
दहशतवाद खपवून घेणार नाहीच!
दरम्यान, लष्करप्रमुखांनी यावेळी पाकिस्तानलाह कडक शब्दांत सुनावलं आहे. दहशतवाद जराही खपवून घेतला जाणार नाही, असं म्हणतानाच पश्चिमेकडील सीमाभागात काय सुरु आहे, यावरही त्यांनी लक्ष वेधलं. एलओसी जवळ घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. पश्चिम सीमाभागातील नियंत्रणे रेषजवळ परिस्थिती सुधारणा होत असली, तरी तिथे दहशतवादी कारवाया वाढल्याचंही त्यांनी म्हटलंय. दहशतवाद जराही खपवून घेतला जाणार नाही, असं नरवणे यांनी म्हटलंय. तसंच जर आम्हाल भाग पाडलं, तर त्याची किंमतही वसूल करु, अशा कडक शब्दांत नरवणेंनी पाकिस्तानला इशारा दिलाय. याबाबतचा व्हिडीओ देखील एएनआयनं आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे.