सोयगाव नगरपंचायत निवडणूक : ७६ उमेदवारी अर्जांपैकी ४५ उमेदवारी अर्ज वैध, ३१ उमेदवारांचे अर्ज अपात्र
सोयगाव (विवेक महाजन) सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रीयेदरम्यान छाननी साठी ९० उमेदवारी अर्जांपैकी ७६ नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवारी करण्यात आली. या छाननीत ३१ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र विविध त्रुटीअभावी अवैध ठरविण्यात आले असून ४५ उमेदवारांचे अर्ज माघारीपुर्वी रिंगणात आहे. त्यामुळे सोयगाव नगरपंचायत निवडणुकीची चुरस वाढणार ठरणार आहे.
तेरा प्रभागांसाठी ७६ उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी निवडणूक विभागाकडून हाती घेण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी आदींनी सकाळी अकरा वाजता प्रभागनिहाय छाननीला सुरुवात केली. यामध्ये तूर्तास स्थगिती दिलेल्या प्रभाग क्रमांक एक, दोन आणि चौदा, सोळा या चार प्रभागांची निवडणूक न्यायालयाच्या आदेशाने स्थगित करण्यात आली असल्याने या चारही प्रभागांसाठी प्राप्त चौदा उमेदवारी अर्जांना छाननी मधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर ७६ उमेदवारी अर्ज छाननीसाठी हाती घेण्यात आल्यावर यामध्ये ३१ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात येवून ४५ उमेदवार माघारी पूर्वी रिंगणात असल्याने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि प्रहार, बहुजन वंचित याप्रमाणे राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात असून माघारीपुर्वी सध्या सोयगाव नगरपंचायत साठी सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने शष्टरंगी लढत रंगली आहे. माघारीनंतर मात्र अजून चित्र स्पष्ट होईल त्यामुळे सोयगाव नगरपंचायत साठी लढतीचे चित्र काय होईल याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.