महाराष्ट्र

नगरपंचायतचे अधिकारी घेताय झोपेचे सोंग ; मुक्ताईनगरात प्लास्टिकची विक्री जोरात सुरू

मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर शहरामध्ये प्लास्टिकचे कॅरी बॅग विक्रीचे प्रमाण वाढत असल्याकारणाने नागरिकांच्या अथवा पशुपक्ष्यांच्या व मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही. शहरांमध्ये जागोजागी प्लास्टिकचे ढीग लागलेले आढळत असून नगरपंचायतच्या घंटा गाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वाहून नेले जात आहे. परंतु, प्लास्टिकचे कुठल्याही प्रकारे संपुष्टात आणण्याची उपाय योजना नगरपंचायत करत नसताना दिसून येत आहे.

मुक्ताईनगर शहरामध्ये परिवर्तन चौका लगत असलेल्या शिवाजी उद्दान जवळ दोन मोठ्या लोखंडी कचरा जमाकरण्याचे बॉक्स नगरपंचायतीने ठेवलेले असून त्यामध्ये फळविक्रेते भाजीपाला विक्रेते अथवा इतर पदार्थ विक्री करणारे त्यांचा रोजचा जमा होणारा कचरा हा त्या बॉक्समध्ये टाकला जातो किंवा रस्त्या लगत फिरणारे नागरिक देखील त्या बॉक्स मध्ये कचरा टाकत आहे. परंतु, बॉक्स भरगच्च भरून तो कचरा त्याच ठिकाणी रस्त्यावर सांडला जात असून शहरातील मोकाट जनावरे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्या बॉक्स च्या आजूबाजूला त्या ठिकाणी फिरत असून पूर्ण कचरा अस्ताव्यस्त करत असून प्लास्टिक च्या पिशवी मधील खाद्य पदार्थ च्या बरोबर प्लास्टिक खात आहे. यातून जनावरांचा भरपूर मोठा जीव जाण्याचा संभव आहे. बहुतांश वेळेस गाई गुरेढोरे यांच्या पोटामध्ये काही डॉक्टरांना सर्जरी करताना त्यांच्या पोटा मध्ये प्लास्टिकच निघालेले आहे. फळ विक्रेते व भाजीपाला, मटण,  व इतर विक्रते यांच्याजवळ सहज प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होत असून नगरपंचायत यांच्याकडे कानाडोळा करत आहे. नेमका कानाडोळा करण्याचे कारण काय शासनाने नागरिकांचे हित जोपासणे सोडून व मुक्या प्राण्यांचे रक्षणाचे सोडून अशा प्लास्टिक विक्री करणारे अथवा प्लास्टिक पिशवीमध्ये वस्तू देणारे यांना नगरपंचायतचा पाठबळ का मिळत आहे यामागचे कारण तरी काय असा प्रश्न सूज्ञ नागरिक उपस्थित करत आहे.

नगरपंचायतने गोळा केलेला कचरा त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक उपलब्ध होत असून ते प्लास्टिक डम्पिंग ग्राउंड वर टाकले जात आहे. त्यामुळे तेथील जवळपासचे शेतकरी वर्ग यांच्या शेतातल्या पिकाला हानी होत असून पिके खराब होऊन जमीन नापीक होताना दिसून येत आहे व तेथील जमीन निकृष्ट व नापीक होत आहे याला जबाबदार कोण त्या जमिनीचे व खराब झालेल्या पिकाचे पैसे नगरपंचायत अथवा मुख्य अधिकारी भरून देणार का  असा प्रश्न शेतकरीवर्ग यांना सुद्धा निर्माण होत आहे. नगरपंचायत मुळे आमचा फायदा तर नाही उलट नुकसान होत आहे अशी चर्चा नागरिक करत आहे.

डम्पिंग ग्राउंड वरती टाकलेला कचरा व प्लास्टिक हे त्याठिकाणी जागेवरच पेटवून दिले जात आहे व तिथली राख व अर्धवट जळालेले प्लास्टिक हे संपूर्ण नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने टाकण्यात येत असून मुक्ताईनगर शहरवासीयांच्या जीवाशी नगरपंचायत खेळत आहे. नागरिकांचे काही बरेवाईट झाल्यास नगरपंचायत जबाबदार राहणार का ?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.

नगरपंचायत अस्तित्वात येऊन भरपूर वर्ष झाले असून नगरपंचायत चा नवीनच कारभार मुख्य अधिकारी अश्विनी गायकवाड यांनी सांभाळला होता. त्याप्रसंगी मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी साईमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले होते की, मुक्ताईनगर शहर संपूर्ण प्लास्टिक मुक्त करणार असे आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिले होते परंतु अद्यापही त्या बाबत कुठलेही आश्वासन मुख्य अधिकारी यांनी पूर्ण करू शकले नाही. प्लास्टिक मात्र जोमाने विक्री व प्रत्येक नागरिकांच्या हातामध्ये कापडी पिशवी च्या जेवजी प्लास्टिक च्याच पिशव्या आढळून येत आहे. दुकानदारच आपला माल विकला जाण्यासाठी प्लास्टिक पिशव्या सहज उपलब्ध करून देत आहे तसेच दारूच्या अवैध दारू विक्री करणारे यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा प्लास्टिक पिशवीचा वापर जास्त होत आहे. कारण दारूच्या बाटल्या पकडल्या जातात तर प्लास्टिक पिशवीमध्ये दारू टाकून ती जोरात विकली जात आहे आणि त्याखाली झालेल्या प्लास्टिकच्या पीशव्यांच्या ढीकच ढीक पडलेला दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे