काँग्रेसचे २१ फेब्रुवारीला माफी मांगो आंदोलन
मुक्ताईनगर (सचिन झनके) ग्रामीण (शैलेश गुरचळ) रावेर लोकसभा मतदार संघातील शहर व तालुक्यातील काँग्रेसचे सर्व फ्रंटल प्रमुख नेते व सर्व पदाधिकारी आणि सर्व काँग्रेसवर प्रेम करणारी मंडळी यांना सूचित करण्यात येते की दिनांक २१/०२/२०२२ रोजी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यालय येथे, दुपारी २.०० वाजता प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी सर्व प्रमुख पदाधिकारी व काँग्रेस वर प्रेम करणारे यांनी आंदोलनास हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनात रावेर लोकसभा मतदार संघातील तालुका व शहर काँग्रेस कमिटी, शहर महिला काँग्रेस, तालुका व शहर सेवादल, तालुका व शहर युवक काँग्रेस, तालुका व शहर एन.एस.यु.आय, सोशल मिडिया काँग्रेस, तालुका व शहर ओबीसी काँग्रेस विभाग, तालुका व शहर मागासवर्गीय काँग्रेस विभाग, तालुका किसान काँग्रेस विभाग, तालुका व शहर अल्पसंख्याक काँग्रेस विभाग आदी उपस्थित राहणार आहेत.