पागोटे येथे शिवजयंती साजरी
उरण (विठ्ठल ममताबादे) शिवजयंती निमित्त ‘पागोटे टेनिस क्रिकेट’ यांच्या माध्यमातून पागोटे प्रीमियर लीग 2022 आयोजित करण्यात आली होती या लीग मध्ये 5 संघ मालकांनी 5 संघ घेतले होते.त्या मध्ये 60 खेळाडूनी सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली.
या स्पर्धेत फायनल मध्ये आपला चांगला खेळ करत 2 संघांनी प्रवेश केला. कुणाल पाटील यांचा संघ king11 व आलोक पाटील यांचा वीर मराठा या दोन संघात सामना झाला शेवटच्या क्षणात मात्र king11 संघाने चागला खेळ करत पागोटे प्रीमियर लीग च्या किताब चॅम्पियन ट्रॉफी वर आपल्या संघाचा नाव कोरला. या स्पर्धेत सर्वत्कृष्ट खेळाडू म्हणून कुवल इव्हेंजर च्या कर्णधार कुमार पाटील याला गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून king11 च्या मच्छिंद्र भोईर याला गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून क्रिशा स्टाईकर च्या विशाल पाटील याला देण्यात आले. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ऋषिकेश म्हात्रे व विनय सिंग यांना देण्यात आले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पागोटे प्रीमियर लीग पार पडली. तसेच पागोटे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.
जाणता राजा प्रतिष्ठाण-पागोटे व सर्व शिवप्रेमी यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या आनंदात उत्साहात साजरी करण्यात आली. पागोटे येथे हुतात्मा रंगमंच येथे शिवप्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.व शिवरायांच्या जय घोषात पूर्ण परिसर दुमदुमन गेला. संध्याकाळी 6 वाजता पागोटे गावात भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली . लहान मुलांसाठी फेन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करून त्यांना बक्षिसे देण्यात आले.