टेम्ब्रुसोंडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची राष्ट्रीय स्तरावर शासकीय प्रतिकृतीची निवड !
टेम्ब्रुसोंडा : टेम्ब्रुसोंडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची राष्ट्रीय स्तरावर तालुक्यातील शासकीय प्रतिकृतीची निवड झाली. माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा टेम्ब्रुसोंडा या शाळेतील विद्यार्थीनी प्रिती शालीकराम कास्देकर हिने राज्य स्तरावरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनामध्ये अव्वल क्रमांक पटकाविला असुन दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय (Natfanl) Inspire Award २०२२ प्रदर्शनी करीता प्रितीची राज्यातील ३३ प्रतिकृती मध्ये निवड करण्यात आली आहे.
प्रीती ने आपल्या यज्ञाचे श्रेय प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा टेंम्ब्रुसोंडाचे मुख्याध्यापिका एन. एच जाधव शाळेतील विज्ञान शिक्षक व मार्गदर्शक एस. डी. सोनाळेकर यांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल पचायत समिती चिखलदरा अमरावती शिक्षण विभाग तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्तरातून प्रीतीचे कौतुक केले जात आहे. प्रीती शालीकराम कास्देकर ही चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागातील असुन तिच्या प्रतिकृतीचे नाव अॅटोमेटेड कोकोनट स्कॅपींग मशीन आहे. या प्रतिकृतीमुळे भविष्यातील नारळ रखडने हि प्रकिया सुलभ होणार आहे. हि प्रतिकृती पुर्णतः घरातील टाकाऊ वस्तू पासून बनविली आहे.