साक्री नगरपंचायत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित
साक्री (प्रतिनिधी) राज्यातील १३९ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून खुल्या प्रवर्गासाठी १०९ अनुसूचित जातीसाठी १७ तर अनुसूचित जमाती साठी १३ पदे राखीव झाली आहेत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली.
साक्री नगरपंचायतीचे अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे भारतीय जनता पार्टीने शहरात १७ पैकी एकूण अकरा जागांवर विजय मिळवला आहे त्यामुळे साहजिकच सत्तेवर त्यांचा दावा आहे. या विजयी उमेदवारांमध्ये दोन महिला आदिवासी जमाती प्रवर्गातील आहेत. वार्ड क्रमांक ३ मधून भाजपाच्या पवार उषाबाई अनिल या ४९९ मते मिळवून तर वार्ड क्रमांक आठ मधून पवार जयश्री हेमंत या भाजपच्या उमेदवार ४०४ मध्ये घेऊन विजयी झाले आहेत. निवडणूक निकालानंतर वादाचे गालबोट लागून या वादात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर व भाजपच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांचा काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते व शहराचे राजकारण पुढील काळात कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.