महाराष्ट्र
सांडप गाव येथे मनसे कडून लोकोपयोगी शासकीय योजनेचा कार्ड वाटप कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला
ठाणे : जिल्हा विशेष प्रतिनिधी
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र.१२१ मध्ये कल्याण डोबिवली ग्रामीण चे आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व योगेश रोहिदास पाटील डोंबिवली शहर संघटक म.न.से माजी सरपंच घारीवली गाव यांच्या वतीने युनिव्हर्सल पास,आयुष्यमान हेल्थ केअर,ई श्रम कार्ड सांडप गाव येथे आज रोजी प्रवीण पाटील उप विभाग अध्यक्ष,हर्षद पाटील शाखा अध्यक्ष, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शासकीय कार्यक्रम आयोजित करून कार्ड त्वरित वाटप केल्याबद्दल गावकऱ्यांनी आणि कार्ड धारकांनी आमदार राजु पाटील व योगेश रोहिदास पाटील, प्रवीण पाटील,आणि समस्त मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले.