खोटे पुरावे देऊन मिळविला पेट्रोल पंप ; ३४ वर्षांनंतर माजी खासदारावर गुन्हा
धुळे (करण ठाकरे) साक्री तालुक्यातील दहिवेल शिवारात बनावट दस्तऐवज, खोटे पुरावे देवून पेट्रोल पंप मिळविला. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही ती लपवून ठेवण्यास सहाय्य केल्याप्रकरणी बापु चौरेंसह विविध विभागांच्या तत्कालीन १२ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ३४ वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
सामाजिक कार्यकर्ते अॅड. तुकाराम निंबा मासुळे (वय ४३ रा. चित्तोड ता धुळे) यांनी साक्री पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. त्यात म्हटले आहे की, सन १९८८ मध्ये बापु हरी चौरे यांच्यासह विविध विभागांच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी दहिवेल (ता. साक्री) येथील नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील साईबाबा हायवे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमीटेड रिटेल पेट्रोलपंपाच्या रिटेल आऊटलेट पेट्रोलपंप मंजुरीसाठी व सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या, नाहरकती दाखले महसुल रेकॉर्ड विद्युत कनेक्शन विस्फोटक पदार्थ अधिनियम अन्वये लागणारे अधिकारी यांनी दिलेले तपासणी अहवाल, नाहरकती या बोगस व बनावट दस्तऐवज तयार केले खोट्या फेरफार नोंदी तयार करून खोटे पुरावे कंपनीस सादर करून पेट्रोलपंप मिळविण्यात आला. ही बाब इतरांच्या निदर्शनास आणुन दिल्या त्यानंतरही ही बाब लपवून ठेवण्यास सगनमताने सहाय्य केले