नाना पटोले यांच्या प्रतिमेला काळे फासून भाजपचे आंदोलन
धुळे (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी धुळे महानगर तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धुळे जिल्हाच्या वतीने व माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाने तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या प्रतिमेला काळे फासले. तसेच लहान बालकास त्यांच्या प्रतिमेवर लघुशंका करून निषेध नोंदवून आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल, नगर सेवक बंटी मासूले, दगड़ू बागुल, भगवान देवरे, ओबीसी मोर्चा जिल्ह्य सरचिटणीस सुरेश आहिरे, ओबीसी उपाध्यक्ष किशोर थोरात, उपाध्यक्ष कल्पेश थोरात, पवन जाजू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.