मालपुर येथे महाधन पीक परिसंवाद कार्यक्रम आयोजित
मालपुर (गोपाल कोळी) ऊस आणि कांदा पिकासाठी विशेष उपाय म्हणून नव्याने बाजारात आलेल्या महाधन क्रॉपटेक खताच्या वापरामुळे झालेले फायदे शेतकऱ्यांना दाखवून देण्यासाठी महाधनचे झोनल ट्रेनिंग मॅनेजर गहिनीनाथ ढवळे, एरिया विक्री व्यवस्थापक शिवानंद वारले, सेल्स मॅनेजर स्वप्नील पाटील, मार्केटिंग मॅनेजर धर्मराज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर सागर बच्छाव, विशाल ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महावीर सिहजी रावल हे होते.
शिंदखेडा तालुक्यातील मालपुर या ठिकाणी महाधन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात ऊस पिकासाठी असलेल्या महाधन क्रॉपटेक 9.24.24 या उत्पादनाबद्दल माहिती दिली. त्यामध्ये ऊस उत्पादनातील खर्च 10% नी कमी होते, उसाच्या उत्पादनात 10-12% वाढ होते, गाळप योग्य उसात 5% नी वाढ होते. उसाच्या पेऱ्याच्या संख्येत 5% नी वाढ होते, पेराच्या जडीत 2-3% वाढ होते.
तसेच यावेळी कांदा पिकासाठी उपयुक्त असलेले महाधन क्रॉपटेक 8.21.21 याविषयी माहिती देण्यात आली. त्यात कांदा पीक उत्पादनातील खर्च 20% नी कमी होते, कांदा पिक उत्पादनात 10-12% वाढ होते, 85-90% कांदा अ आणि ब दर्जाचा मिळतो. कांदा चाळीमध्ये 6 महिने पर्यंत टिकून राहतो. तसेच यावेळी माती आणि पाणी परीक्षण या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन गहिनीनाथ ढवळे यांनी केले.
येणाऱ्या कपाशी हंगामासाठी महाधन क्रॉपटेक कपाशी या खाताविषयी माहिती देण्यात आली व येणाऱ्या हंगामात हे खत बाजारात लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विषयी ही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
यावेळी महाधनचे अधिकृत सहविक्रेते धनश्री कृषी सेवा केंद्राचे निलेश भाऊसार, अमोल कृषी सेवा केंद्राचे अमोल भाऊसार, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र आत्माराम पाटील, सरपंच माचिंद्रा पारधी, गजानन भाऊसार, रवींद्र राजपूत, नगराज पाटील आदींसह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.