श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बोरसर गावांमध्ये श्री भागवत कथेचे आयोजन.
दिनांक ३१ जुलै २०२२ प्रतिनिधि-अशोक पवार
वैजापूर तालुक्यातील बोरसर गावांमध्ये चालू असलेल्या दरवर्षीप्रमाणे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बोरसर गावांमध्ये श्री भागवत कथेचे आयोजन करण्यात आले समस्त गावकऱ्यांच्या वतीने रोज भागवत कथेचे श्रवण केले जात आहे भागवत कथा सांगत असताना श्री अष्टीकर बाबा शास्त्री महानुभव सौदाणेकर यांच्या अमृतमय वाणीतून कथेचे श्रवण केले जात आहे . आहे ऐस देव वदवावी वाणी नाही जसा मनी अनुभवना।।१।।
आवडी आवडी कळीवरी वरीले आंतरी ताळ पडे ।।२।।धन्य आर्पूव दर्शन माते पुन्न भेटी। रडे मागे तुटी हर्ष योगे ।।३।। तुका म्हणे एके कळते दुसरे।बरीयाना बरे आहेच आहात।।४।। अभंगवर निरूपण केले यावेळीह उपस्थित ह भ प भाऊसाहेब महाराज जीरीकर यांचेही २७ जुलै रोजी कथेचे आयोजन केले होते श्री दत्तराज बाबा बोरसर ग्रामस्थांच्या परिसरातील गावातील भजनी मंडळ व वारकरी भाविक ग्रामस्थ नागरिक यांच्या उपस्थित कार्यक्रम आनंदात व उत्साहात चालू आहे.