महाराष्ट्र

देगलुरू वीर सैनिक ग्रुपच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

नांदेड (प्रतिनिधी) सैनिक हा देशाची सुरक्षा तर करतोच त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून जे सैनिक सुट्टीवर येतात ते आणि माजी सैनिक संघटना यांच्या द्वारे देगलुर मध्ये विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या संपन्न करीत आहेत.

जसे की, डॉक्टर्स आणि मेडिकल कर्मचारी यांचे “कोरोना वॉरियर्स” म्हणून गौरव करणे आणि “ब्लड डोनेशन कैंप” आयोजित करने आदी दि. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी वीर सैनिक ग्रुप (देगलूर) च्या वतीने गुणवंत विद्यार्थी (एम.बी.बी.एस ला निवड झालेले) व विविध क्षेत्रातील (राजकीय व सामाजिक) मान्यवरांचा गौरव करण्यात आले. यामध्ये संजय तोनसुरे ओम संगमेश्वर मेडिकल स्टोर देगलूर यांचा मुलगा शुधांनशु संजय तोंनसुरे आणि डॉ उत्तमराव इंगोले धन्वंतरी हॉस्पिटल देगलूर यांची मुलगी दीक्षा उत्तमराव इंगोले या दोघांचे एम बी बी एस साठी निवड झाल्यामुळे त्यांच शाल, श्रीफल, पुष्पहार आणि ग्रुप चे स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

त्याच बरोबर देगलूरचे नगर अध्यक्ष श्री मोगलाजी इरान्ना शिरशेटवार हे देगलूर नगरीचे प्रसिद्ध राजकारणी तर आहेतच त्याचबरोबर जनतेसाठी अविरत झटणारा समाजकारणी म्हणून देखील त्यांची महत्वाची ओळख आहे. त्यांचा विविध सामाजिक- विकासत्मक कार्य तसेच शहीद वीर जवान, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, परमवीर चक्र विजेता शहीद स्मारकाची स्थापना केल्याबद्दल यांचे देखील वीर सैनिक ग्रुप च्या वतीने शाल, श्रीफल, पुष्पहार आणि ग्रुप चे स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. आणि शहीद कॅप्टन मनोज धाडे यांच्या स्मारकचे शुशोभीकरण करण्यात यावे आणि शहीद जवानाचे भव्य स्मारक बनवून पुतळा बसविण्यात यावा आणि शहीद भगतसिंह चौकाचे शुशोभीकरण व पुतळा बसविण्यात यावे आणि आजी माजी सैनिकांच्या घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

अध्यक्ष यानी आमच्या मागणीची दखल घेऊन जर पुन्हा आमची सत्ता आली तर लगेच शहीद जवानांचे भव्य स्मारक आणि शुशोभिकरण करु व लवकरच पुतळा बसवु व सरकारी GR नुसार आजी माजी सैनिकांच्या घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. देगलूर तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील हे नागरिकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन व त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलीत असल्याने नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष जागा आहे. सैनिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न करणारे आमचे सम्मानिय देगलूर शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील यांचे देखील वीर सैनिक ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आले. वरील उपक्रम हे सूबेदार संतोष केंचे साहेबांच्या अध्यक्षतेखाली इरवंत गाडेकर, श्रीकांत बरसमवार, बनसोडे बळी ,सचिन वनजे, शिवराज जांभळीकर व विध्यार्थी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशीसह उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे