तहानलेल्या व भुकेल्या चिमण्यांसाठी घराजवळ धान्य व पाणी ठेवा ; माणक चौधरी यांचे चिमुकल्यांना आव्हान
शहादा (प्रतिनिधी) काही काळ पहिले सर्व ठिकाणी चिमण्यांच्या चिवचिवटाने दिवस सुरु होत होता पण तो चिवचीवाट आता दिसत नाही. तो आवाज ती किलबिलाट पुन्हा ऐकू यावी व चिमण्या बद्दलचे प्रेम वाढावे म्हणून दरवर्षी 20 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा करण्यात येतो. त्या निमित्तानेच साने गुरुजी मित्र मंडळाने जिल्हा परिषद मराठी शाळा सुलतानपूर ता शहादा येथे चिमणी चित्रकला स्पर्धा घेऊन आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा केला. या स्पर्धेत शाळेतील एकूण 39 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माणक चौधरी अध्यक्ष सानेगुरुजी मंडळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव गुलाबराव पवार , मुख्याध्यापक दत्तात्रय अहिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वप्रथम सानेगुरुजींच्या प्रतिमेसपूजन करण्यात आले. यावेळी माणक चौधरी यांनी आव्हान केले की चिमनी कीटक खाऊन शेतकऱ्यांना मदतच करते म्हणून त्यांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने उन्हाळ्यात घराजवळ धान्य व मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे या वेळी चित्रकला स्पर्धेतून हा संदेश या चिमुकल्यांना देण्यात आला या चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक हा नीलिमा दिनेश माळी तर द्वितीय कुणाल जीवन शिंदे, तृतीय धनराज रामा मोरे, उत्तेजनार्थ खुशी हिम्मत ब्राह्मणे व गुणवंत विद्यार्थी अतिम महेश शेंमले, राज गणेश शिंदे, लांजी सुभाष ठाकरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले तसेच भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शेवटी सर्वांनी चिमणी वाचविण्यासाठी वृक्ष लागवडीचा संकल्प केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पवार यांनी तर सूत्रसंचालन हिरालाल मुसळदे व आभार रत्नकांत भोईटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती पवित्रा देवरे,भरतसिंग पाडवी, उंबऱ्या वसावे आदींनी परिश्रम घेतले.