महाराष्ट्र
गोळवाडीचे भूमिपुत्र मनाजी मिसाळ यांनी उचलला विकास कामाचा विडा
वैजापुर (गहिनीनाथ वाघ) वैजापुर तालुक्यातील गोळवाडी मधील शेतकऱ्यांना पाच विहिरी वेगवेगळ्या योजनांमधून मंजूर करून शेतकऱ्यांना समर्पित केल्या व तालुक्यातील जळगाव येथील शेतकऱ्यांना वैजापूर पंचायत समिती सभापती सीना मानाजी मिसाळ यांनी दहा विहिरी मंजूर करून जळगाव येथील शेतकऱ्यांना समर्पित केल्या व त्याचे आज भूमिपूजनही केले. त्यावेळेस उपस्थित काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष तांबे, वैजापूर पंचायत समिती माजी सभापती बाळू शेळके, जळगावचे सरपंच संभाजी जगताप हे उपस्थित होते.