आजचे राशिभविष्य, गुरुवार १४ एप्रिल २०२२ !
मेष : दुपारी किंवा संध्याकाळी महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे. करार दुपारी ४ नंतर करावे. पांढरा आणि पिवळा रंग शुभ आहे. यथाशक्ती दान करावे. तिळाचे दान लाभदायी आहे.
वृषभ : तब्येत सांभाळा. राजकारणात यशस्वी व्हाल. हुशारीने बोलाल आणि प्रभाव पाडाल. निळा आणि पांढरा हे शुभरंग आहेत. उडीद दान करा.
मिथुन : विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. नोकरी व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी प्रगतीची संधी साधण्याचा दिवस. मकर आणि तुळेच्या लोकांचा लाभ होईल. पांढरा रंग शुभ आहे.
कर्क : नोकरीत प्रगतीचा योग आहे. गुरु आणि शनि ग्रहाचा प्रभाव असलेल्यांकडून मोलाची साथ मिळेल. धर्मकार्याचा योग आहे. पिवळा आणि पांढरा हे शुभ रंग आहेत.
सिंह : वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. धार्मिक कार्यांसाठी वेळ काढणे हिताचे. नारंगी आणि पांढरा रंग आपल्यासाठी लाभाचा. व्यवसायात लाभ होईल.
कन्या : लाल आणि पांढरा हे आपल्यासाठी शुभरंग आहेत. राजकारणात प्रगतीचा योग. बोलून प्रभाव पाडाल. ओळखी वाढवाल. माणसं जोडणे हिताचे.
तूळ : नोकरीत सातत्य आणि प्रामाणिक कष्टांचा लाभ होईल. प्रगती होईल. श्री सुक्ताचे पठण लाभाचे. निळा आणि हिरवा हे शुभरंग.
वृश्चिक : गुरु आणि बुधामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. उडदाचे आणि मुगाचे दान करणे हिताचे. श्री सुक्ताचे पठण लाभाचे. राजकारण आणि व्यवसायात प्रगती होईल. शुभ रंग लाल आणि हिरवा.
धनु : राजकारणात प्रगतीचा योग. सुखासाठी मर्यादीत संघर्ष करावा लागेल. सप्तश्लोकी दुर्गा पठण हिताचे. हिरवा आणि नारंगी शुभरंग.
मकर : प्रगती होईल. लाभांचा दिवस आहे. कनकधारास्तोत्र म्हणा. हिरवा आणि पांढरा हे शुभरंग
कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. तब्येत छान राहील. अरण्यकाण्ड वाचाल तर आणखी लाभ होईल. शुभरंग आहेत पिवळा आणि नारंगी.
मीन : वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. हनुमानबाहुक वाचा. लाल आणि हिरवा हे शुभरंग.