सोयगांव तालुक्यात दोन वर्षानंतर रंगपंचमी साजरी
सोयगांव (प्रतिनिधी) तालुक्यात धुलिवंदनाचा सण बंजारा समाजात फार उत्साहाने व पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. कोविड-19 साथ रोगाच्या अनुषंगाने गेल्या दोन वर्षानंतर तालुक्यात रंगपंचमी साजरी करण्यात आली. युवानेते तथा सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तालुक्यातील वाडी वस्त्यांना भेटी देत धुलीवंदन सण साजरा केला.
यावेळी समीर यांनी निंबायती तांडा, न्हावी तांडा, रामपुरा तांडा, जंगला तांडा, फर्दापूर तांडा, वरखेडी तांडा आदी ठिकाणी भेटी देत या उत्साहात सहभागी होवून येथील नागरिकांना होळी व धुलीवंदन सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, सोयगाव न.प. तील शिवसेना गटनेते अक्षय काळे, माजी सभापती धरमसिंग चव्हाण, नगरसेवक अकील वसईकर, दिपक पगारे, संतोष बोडखे, राजू दुतोंडे, शेख रउफ, कदिर शहा, शरीफ शहा, बबलू शेख, मंगेश सोहनी, भगवान वारंगने, सांडू राठोड, सुरेश राठोड, अकील देशमुख, यशवंत जाधव, भरत राठोड, बाबू ठेकेदार, श्रावण राठोड, हिरा चव्हाण, श्रावण जाधव, प्रताप जाधव, राहुल राठोड, वसंत जाधव, विनोद राठोड, स्वप्नील शेळके, तुषार चौधरी आदींची उपस्थिती होती.