महाराष्ट्र
देगलूर शिवसेना सचिवपदी धनाजी मनोहरराव जोशी यांची नियुक्ती
देगलूर (प्रतिनिधी) शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदजी जाधव जिल्हाप्रमुख मा श्री उमेश मुंडे साहेब यांच्या आदेशावरून देगलूर शहरातील धडाडिचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते जांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ब्रिज व्याख्याने 80% समाजकारण व 20% राजकारण या तत्वावर चालणारे अनेक सुख दुखात सहभागी होणारे व पक्ष संघटनेत कुशल नेतृत्व असलेले धनाजी मनोहरराव जोशी यांची शिवसेना देगलूर शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे पत्र देण्यात आले व पुष्पहार घालून स्वागत केले व शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार, शिवसैनिक हणमंत राजुरे आदी उपस्थित सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते होते.