करोडो खर्च : पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश
नागरिकांचे पाणी पडवणाऱ्याना तुरुंगाचे पाणी पाजले जाईल का ?
पाचोरा (सतिष बावस्कर) तालुक्यातील नांद्रा येथे आज युवकांनी येऊन पाण्यासाठी आक्रोश केला आज अक्षय तृतीया सारखा सण असताना माठात पाणी नव्हते, त्यामुळे गावातील नागरिक संतप्त होते. विशेष पेयजल योजनेतून करोडो रुपये खर्च करून ही गावात नागरिकांना पाण्यासाठी वण-वण फिरावे लागते. 20 दिवसानंतर पाणी येऊन ही सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक हे मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत, संतप्त नागरिकांनी आज ग्रामपंचायत समोर येऊन आक्रोश केला
यावेळी ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील, अमोल सूर्यवंशी, योगेश सूर्यवंशी यांनी संतप्त नागरिकांशी संवाद साधला. ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी स्व:खर्चाने पाणी पुरवण्याचे नागरिकांना आश्वासन दिले, पण प्रश्न निर्माण नागरिकांची तहान खऱ्या अर्थाने कधी भागेल व नागरिकांचे पाणी पडवणाऱ्याना तुरुंगाचे पाणी पाजले जाईल का ?.