महाराष्ट्र
सोयगाव शहरातील व्यापारी महासंघ कडून एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा.
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगाव : एसटी कर्मचाऱ्यांना शासनात विलीन करून घ्यावे या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दिपावळी व भाऊबीज काळात प्रवाशांची मोठी अडचण झाली होती.
मागणी मान्य होईपर्यंत संप मागे नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.या भूमिकेला सोयगाव व्यापारी महासंघच्या वतीने सुरु असलेल्या संपास पाठिंबा देण्यात आला,यावेळी सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन,उपाध्यक्ष नितेश बिर्ला,सचिव प्रमोद रावणे, अभय कोटेजा, आदी व्यापारी वर्ग उपस्थित होते.