महाराष्ट्र
पुरमेपाडा परिसरात फवारणी करतांना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू
धुळे (विक्की आहिरे) तालुक्यातील पुरमेपाडा येथील शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमसिंग कच्छवा- राजपूत असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
प्रेमसिंग कच्छवा- राजपूत वय ३५ हे शेतकरी शेतात फवारणी करत असताना यावेळी विषारी द्रव त्यांच्या नाकातोंडात गेल्यामुळे विषबाधा झाली. यातून प्रेमसिंग यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे अत्यवस्थ स्थितीत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शेतकऱ्याच्या मृत्यू झाला देव पुरमेपाडा परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी करीत आहे.