पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची तारीख बदलली ; १४ ऐवजी २० फेब्रुवारीला होणार मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब विधानसभेसाठी आता १४ फेब्रुवारी ऐवजी २०फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी चार दिवसाने मतदान पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस, भाजप आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसने १४ फेब्रुवारीला रविदास जयंती असल्यामुळे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी ठेवू नये यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. अनुसूचित जातीचे लोक त्या दिवशी राज्याबाहेर असतील. ते यूपीतील वाराणसीला जाऊ शकतात. अशा परिस्थितीत ते लोक मतदान करू शकणार नाहीत आणि मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहतील अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली होती.
पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. यापूर्वी, निवडणूक आयोगाने १४ फेब्रुवारी रोजी मतदान आणि १० मार्च रोजी निकाल जाहीर केला जाईल, असं म्हटलं होतं. मात्र, आता बदलेल्या तारखेनुसार १६ फेब्रुवारी रोजी मतदान आणि १० मार्चला मतमोजणी होईल.