शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित शैक्षणिक संकुलातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव
शिंदखेडा (यादवराव सावंत) तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित एम एच एस एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल मधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती प्रा. सुरेश देसले होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल देसले, पोलीस निरीक्षक सुनील भाबड, संस्थेचे सचिव आनंद चौधरी, संचालक आधार महारु पवार, डॉ. एन पी पाटील, प्रा.प्रदीप दीक्षित, चंद्रशेखर चौधरी, मोतीलाल पवार, नगरसेविका वंदना परमार, माजी नगरसेवक चेतन परमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. शिक्षणाने व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते. शिक्षण मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्याची विद्यार्थीदशेत आपल्या शिक्षकांविषयी आदराची भावना कमी होत असल्याची खंत कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती प्रा. सुरेश देसले यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती राहावी म्हणून खेळाला महत्त्व देणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे बौद्धिक तर खेळामुळे शारीरिक ऊर्जा शरीराला मिळते. शालेय जीवनात झालेले संस्कार हे पुढील आयुष्य जगण्यासाठी दिशा देणारे ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चांगले संस्कार अंगी रुजवावे असे आवाहन कार्यक्रमाचे श्री.देसले यांनी केले. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुनील भाबड, संचालक आधार महारु पवार, प्रा.प्रदीप दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य टी एन पाटील, मुख्याध्यापक के.बी. अहिरराव, शिक्षक-प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एन.नेरपगार , सूत्रसंचालन प्रा. अजय बोरदे व प्रा.माधुरी पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दिपक माळी यांनी केले.
सत्कारार्थी विद्यार्थी
विज्ञान शाखा- जडे तनया संजय, पवार कृष्णा वसंतराव,देसले हर्षाली सुनील
आर्टस् शाखा–पाटील नंदिनी तुकाराम,मोरे कुणाल आबा,कोळी प्रियांका रणजीत
कॉमर्स शाखा- साळुंखे मोहिनी संदीप , बैसाणे हर्षिता अशोकभाई , गोसावी अवंतिका गणेशगिर
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात माळी लता छोटू , माळी सुवर्णा कैलास. पवार दीपक दिगंबर
एम.एच.एस.एस.हायस्कुल
मोहित रविंद्र माळी,देसले अजय शाम, अनुज वाघ
अँग्लो उर्दू हायस्कूल
अशरीन बानो मुस्ताक पिंजारी, अलमहक शरीफ खाटीक,इशरीन कौसर समीरखान पठाण,मुबश्शेरीन शेखनाजीम कसाई.
आंतरराष्ट्रीय योगा दिन देखील हायस्कूल मध्ये साजरा करण्यात आला. योगा दिनानिमित्त शाळेतील जेष्ठ शिक्षक आर. पी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांकडून योगा करून घेत योगाचे महत्त्व विशद केले.