तळोदा पोलीस दलाच्या वतीने येणाऱ्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पथसंचलन
तळोदा (दिपक गोसावी) शहरात आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोदा पोलीस दलाच्या वतीने शहरात पोलीस व होमगार्ड यांनी संयुक्त शहरातील मेनरोड, बसस्टँड, स्मारकर चौक, आदि रस्त्यावर रुट मार्च काढला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मार्च महिन्यापासून भारतीय सण उत्सवाला सुरुवात होते. होळी, धुलीवंदन, आदिवासी बांधवांच्या चालणारा पांच दिवसांच्या होलीकोत्सव, शिवजयंती यासारखे छोटे-मोठे सण उत्सव एका पाठोपाठ येत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळत आहे. आगामी पुढे येणा-या सण उत्सवाचा पार्श्वभूमीवर तळोदा शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तळोदा पोलीसांचे कर्तव्य या पार्श्वभूमीवर शहरात शक्ती प्रदर्शन म्हणून तळोदा शहरात पोलीस विभागाच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गावरुन रुट मार्च काढण्यात आला. यावरून तळोदा पोलीसांची रंगीत तालिम शहरवासीयांना पहावयास मिळाली. या रुट मार्च मध्ये तळोदा पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, बागुल, पोलीस युवराज चव्हाण, विलास पाटील, दिलीप वसावे, दिनेश वसावे, चंद्रसिंग वसावे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोठ्या संख्येने रुट मार्च मध्येउपस्थित होते.