२०२१ मध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी ; पुरग्रस्तांची तहसीलदारांकडे मागणी
वैजापूर (प्रतिनिधी) वैजापूर तालुक्यातील सावखेडा, खंडाळा या गावातील ढेकू नदीकाठच्या २०२१ मध्ये आलेल्या पुरामध्ये अनेक लोक बेघर झाले होते. व घराचे घर उध्वस्त झाले होते. लोकांच्या घरामध्ये पाणी घुसले. धान्य, बैल, शेळ्या व जीवनावश्यक वस्तूंचा नुकसान झाले होते व घरांमध्येही पाणी शिरले होते. त्यामुळे शासनाने तहसीलदार तलाठी व ग्रामसेवक यांना तात्काळ पंचनामे करून पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. पण अद्यापही सावखेड खंडाळा येथील लोकांना एक रुपयेही मिळाला नाही, त्यामुळे लोक त्रस्त झाले आहे.
तसेच तलाठी ग्रामसेवक यांना विचारपूस केली असता तलाठी व ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच बोर नदीच्या काठी बसलेले शेतकरी यांच्या घरामध्ये ही पाणी गेले होते व तेथील तलाठी ग्रामसेवक यांनी पंचनामा करून तुम्हाला तात्काळ मदत करू असे सांगितले असता आज सात ते आठ महिने ओलांडून गेले तरीही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे सावखेडा खंडाळा येथील लोकांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांना अर्ज करून सांगितले की, लवकरात लवकर आमचे नुकसान भरपाई देण्यात यावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. यावेळी पूरग्रस्त लोक, कैलास जाधव, भगवान जाधव, बीजला पवार, काशिनाथ पवार, ज्ञानेश्वर जाधव, मधुकर बागुल, बाबासाहेब आधुडे आदी उपस्थित होते.