अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकरखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचंड चुरशीच्या लढतीत विकास पॅनल ने सर्व जागांवर दणदणीत यश मिळवले असून एकूण बारा जागांवर विजय मिळवला आहे.
विरोधातील सतीमाता पॅनलचा धुव्वाधार पराभव झाला आहे. या निवडणुकीत एकूण 12 पैकी 12 जागा विकास पॅनलच्या विजयी झाल्या आहेत. रविवारी मतमोजणी होऊन निवडणूक अधिकारी एस पी महाजन, सहाय्यक निवडणूक अधिकारी गुलाबराव गायकवाड यांनी निकाल घोषित केला.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ भागवत हिरामण पाटील 153, संजय लोटन कोळी 136, उत्तम भाईदास पाटील 134, भालेराव मन्साराम पाटील 130, प्रभाकर गोपीचंद पाटील 126, उमराव दयाराम पाटील 126, सुरेश शिवाजी पाटील 125, सुभाष आधार पाटील 124, तर इतर मागासवर्गीय प्रवर्गात नामदेव पांडुरंग महाले 137, तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात पंढरीनाथ सांडू सोनवणे 125 मतांनी विजयी झाले आहेत तर महिला राखीव पदासाठी दोन जागांवर अंजनाबाई पुरुषोत्तम पाटील 159 कल्पनाबाई गोरख पाटील 156 मतांनी विजयी झाले आहेत. यानंतर विकास पॅनलच्या समर्थकांनी जोरदार गुलालाची उधळण करून विजय साजरा केला. गावातील सर्वसामान्य शेतकरी मिळून विकास पॅनल तयार करण्यात आले होते. तर प्रस्थापितांनी जोरदार तयारी केली होती मात्र प्रस्थापितांना धक्का देणारा हा निकाल मतदारांनी दिला.