मुख्यमंत्री यांना तहसीलदार सोयगांव यांच्यामार्फत सोयगांव शिक्षक भारतीने दिले निवेदन
सोयगांव (विवेक महाजन) या दिवशी सोयगांव शिक्षक भारती तालुका शाखेने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दि. २१ डिसेंबर २०२२१ पासून पडघा कल्याण येथून जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने लोकशाही सनदशीर मार्गाने पेन्शन मार्च काढण्यात आला होता. या आंदोलकांची बाजू ऐकून न घेता सरकारने दि. २४ डिसेंबर २०२१ रोजी जकात नाका येथे पेन्शन मार्च अडवून पेन्शन मार्च रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच ठाणे येथिल नवघर पोलीस स्टेशनमध्ये आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ही लोकशाहीला काळीमा फासणारी गोष्ट असून याच्या निषेधार्थ तसेच आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन व सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या विषयीचे निवेदन सोयगांव तहसिलदार यांच्यामार्फत दिले.
यावेळी निवेदन सोयगांव तहसीलचे नायब तहसीलदार जाधव साहेब व सुरे यांनी शिक्षक भारती महीला आघिडीतर्फे संगीता सोनवणे, पार्वता भिसे, रेखा सुरडकर, सविता पाटील, स्वाती पतिंगे, सुरेखा चौधरी यांच्या हस्ते स्विकारले. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गिरीष जगताप, बी.आर. मोहीते, नरेंद्र बारी, झगाजी पोतरे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, कार्याध्यक्ष महेश गवादे, किशोर जगताप, प्रभाकर बिर्हारे, सुदर्शन चौधरी, आसिफ देशमुख, सतिष माळी, जावेद खान, नितेश गव्हांदे, शेख एन.एम.सय्यद, एस.जी.अविनाश पवाथ, जितेंद्र कोळी यांच्यासह शिक्षक बंधू भगिंनी उपस्थित होते.