कुऱ्हाड बु येथे मुस्लिम कब्रस्तान जाळीचे कंपाऊंड कामाचा शुभारंभ
पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हाड बु येथे मुस्लिम कब्रस्तान जाळीचे कंपाऊंड करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला. या मतदार संघाचे आमदार गिरिषभाऊ महाजन यांच्या स्थानिक विकास निधीतून तेरा लाखाचे काम मंजूर करण्यात आले.
भाजपा नेते संजू आबा पाटील, माजी सरपंच किरण पाटील, भाजपा गण प्रमुख कुऱ्हाड-लोहारा गट जगदीश तेली यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच गावातील ग्रा.प.सदस्य पवन पाटील, ग्रा.प.सदस्य शिवाजी पाटील, ग्रा.प.सदस्य कालू मुसलमान, उपसरपंच नामदेव पाटील माजी ग्रा.प.सदस्य राजू राठोड, शालीक पाटील, अजित मुसलमान, रुस्तम शेख, कमरुद्दीन शेख, शब्बीर शेख, विलास पाटील, आकाश पाटील, विनोद काळे, अमोल पाटील, सुरेश पाटील, बसराज बंजारा, लक्सिमन बंजारा, महादू बंजारा, इंद्रजित बंजारा, तुकाराम बंजारा, राजू सखाराम बंजारा, तुकाराम पाटील, अन्वर शेख व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते.



