वरणगाव रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलाचे काम पूर्ण करून एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या ; रुखमैया मिना यांच्याकडे भाजपाची मागणी
वरणगाव : रेल्वे स्टेशन वर अप्पर रेल महाप्रबंधक रुखमैया मीना यांनी आज भेट दिली. यादरम्यान माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मिलिंद भैसे, भाजपाध्यक्ष सुनील माळी, अध्यक्ष आकाश निमकर, कामगार नेते मुकेश मेढे यांच्यासह नागरिकांनी भेट घ घेऊन सुपर मंडल रेल प्रबंधक रुखमैया मीना यांच्याशी चर्चा करताना खालील मागण्या केल्या.
वरणगाव रेल्वे स्टेशन वरून वरणगाव शहरातून सिद्धेश्वर नगर जाण्यासाठी पदचारी पूल खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांनी रेल्वे विभागाने पदचारी पूल मंजूर केला कामही सुरू झालंय मात्र हे काम अर्धवट पडलेला असून सिद्धेश्वर नगर येथील येणाऱ्या जाण्याचा संपर्क पूर्णता तुटला आहे. अनेक वेळा रेल्वे क्रॉसिंग करताना अनेक महिलांचे व पुरुषांचे रेल्वे कटिंग मध्ये प्राण गेले आहे. तरी हा पदचारी पूलाचे काम त्वरित पूर्ण करावे, तसेच करोना काळापूर्वी वरणगाव रेल्वे स्टेशन वर महाराष्ट्र एक्सप्रेस शालिमार एक्सप्रेस सेवाग्राम ,एक्सप्रेस यांना पूर्वी थांबा होता संपल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा थांबा बंद केल्यामुळे एक्सप्रेस गाडी वरणगाव शहरात थाबत नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्याकरता आपण त्वरित लक्ष घालून पूर्वी थांबा असलेल्या गाड्यांना परत थांबा देण्यात यावा तसेच गाडीचे मेमो रेल्वे गाडीचे फेऱ्या वाढविण्यात यावा तसेच वरणगाव रेल्वे स्थानकावर रिझर्वेशन खिडकी उघडावी तसेच प्लॅटफॉर्मवर पत्राचे शेड उभारण्यात यावे पिण्याची पाण्याची वेवास्था करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे कामगार नेते मिलिंद मेढे डॉ नाना चांदणे व पदाधिकाऱ्यांनी केली
यावेळी बोलताना अप्पर मंडल रेल प्रबंधक रुक्मिमिया मीना यांनी सांगितले की, १३ जून रोजी शाळेत जाताना मुले ही या रेल्वेचा तळ्यातून कशा प्रमाणे जातील यासाठी मी आज पासून प्रयत्न करणार आहे. तसेच रिझर्वेशन खिडकी व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा हा मी वरिष्ठ कार्यालयाला आपली मागणी पाठवतो असे त्यांनी सांगितले तसेच नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडू नये अशी विनंती यावेळी केली. यावेळी संपूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी करून काय काय सुविधा देता येतील यासाठी आपण सुद्धा खासदार रक्षा खडसे यांना भेटून वरिष्ठ कडे पाठपुरावा करावा असे यावेळी मीना यांनी सांगितले.