गुन्हेगारी

थोरगव्हाण येथील पत्नीच्या हत्याप्रकरणी संयशयीतास चार दिवस पोलीस कोठडी

यावल (अमित तडवी) तालुक्यातील थोरगव्हाण येथे काल झालेल्या पतीकडुन पत्नीच्या हत्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असुन, या गुन्ह्यातील संयशीत आरोपीस न्यायलयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .

या संदर्भातील माहीती अशी की , थोरगव्हाण तालुका यावल येथे काल दिनांक २७ फेब्रुवारी रविवार रोजी गावात राहणारे प्रकाश पांडुरंग पाटील वय ६३ वर्ष व त्यांची पत्नी इंदुबाई प्रकाश पाटील वय ५९ वर्ष यांच्या वाद होवुन संतापाच्या भरात पाटील यांनी आपली पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने त्या गंभीर जख्मी झाल्या होत्या. इंदुबाई यांना तात्काळ उपचारासाठी जळगाव घेवुन जात असतांना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान काल सायंकाळपासुन तर आज दिनांक २८ तारखेच्या दुपारी ३ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल २० तासापर्यंत सदर मरण पावलेल्या महीलेचे मृतदेह हे पंच अभावी शवविच्छेदन होवु न शकल्याने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात शवगृहातपड्डन होते .आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मरण पावलेल्या महीलेवर थोरगव्हाण येथे अंत्यविधी करण्यात आले. दरम्यान या गुन्ह्यातील संयशीत आरोपी प्रकाश पाटील यांच्या विरूद्ध त्यांचा मुलगा आनंदा प्रकाश पाटील यांने पोलीसात फिर्याद दाखल केल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असुन , संयशित आरोपीस यावल न्यायलयात हजर केले असता न्या.व्ही एस डामरे यांनी त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे