क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
शहापूर येथील राजश्री माळी ही नाशिक राज्यस्तरीय स्पर्धेत दोरी उडयात प्रथम
शहापूर (सचिन शेलवले) संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर टहारपुर पो. अघई ता. शहापूर शाळेतील इयत्ता नववी तुकडी ब ची विद्यार्थिनी कुमारी राजश्री रवींद्र माळी (रा. मोहिली माली पाडा पोस्ट अघई, तालुका शहापूर जिल्हा ठाणे) हिने नाशिक येथे झालेल्या दोरी उड्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम विजेतेपद पटकावले. राजश्रीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल तिचे व तिच्या प्रशिक्षक व सर्व शिक्षक वृंद त्याच प्रमाणे आई-वडिलांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.