महाराष्ट्र
शहादा तालुका भरात हनुमान जयंती साजरी व भांडाऱ्याचे आयोजन
शहादा : आज रोजी तालुका भरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली ठीक ठिकाणी गाव पातळी वर ही मारुती मंदिरात रामधून करत रात्र जागरण करून महा प्रसादाचे वाटप करण्यात आले व गरीब नागरिक व भक्त गण याना भांडाऱ्याचे माध्यमातून भोजन देण्यात आले.
यावेळी तालुका भर अनेक गावांनी हा कार्यक्रम साजरा केला मागील काही वर्षे कोरोनाचे सावट खाली होती त्यामुळे अशे सार्वजनिक कार्यक्रम होत नव्हते परंतु आता त्याचे सावट हटल्याने सर्वत्र मोठ्या उत्साहात कार्यक्रम झाले. यावेळी बीजेपी किसानमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कपिल जयस्वाल, सरपंच कांशीराम ठाकरे, पोलिस पाटील जयराज ठाकरे, हरीश चित्रकथी, कणकण संसारे, शहादा मित्रा मंडळ, सुशील जयस्वाल, विश्राम ब्राम्हणे, सुदाम पवारसह आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.