महाराष्ट्र
बोरगांव गावांत डेंगू फवारणी
शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगांव गावांत डेंगू फवारणी करण्यात आली. सर्वत्र तालुक्याभरात डेंगूचे रुग्ण आढळत आहेत. म्हणून आवश्यक उपाययोजना म्हणून बोरगाव ग्राम पंचायत तर्फे संपूर्ण गावात डेंगू फवारणी करण्यात आली.
सध्या वातावरणातील अनियमीतता मुळे डेंगूचा प्रादुर्भाव तालुक्यातील खेड्या पाड्यात दिसून येत आहे. शिरपूर शहरात व तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. बोरगावात अजून डेंगू चा रुग्ण आढळला नाही. परंतु खबरदारी म्हणून ग्राम पंचायतीने गावातील गल्ली बोळात डेंगू फवारणी केली.
यावेळी उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, ग्रामसेवक पी बी सोनवणे, ग्रा पं सदस्य तानकू भिल, पांडुरंग कोळी, दीपक पदमसिंग राजपूत, माजी सरपंच रघुनाथ कोळी, गुलाबसिंग राजपूत, गोलू धुडकू भिल, नाना शिपाई, संगणक परिचालक जितू राजपूत ई चे सहकार्य लाभले.